स्वच्छ समुद्र, हिरवीगार झाडं आणि शांतता, मे महिन्यात फिरण्यासाठी कोकणातील ही ठिकाणं सर्वात बेस्ट

जर तुम्ही मे महिन्यात कुटुंब किंवा मित्रांसोबत फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर कोकणातील ही ठिकाणं तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात. आताच जाणून घ्या माहिती

| Updated on: May 08, 2026 | 2:00 PM
1 / 5
मे महिन्याची सुट्टी म्हटलं की अनेक जण थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. मात्र महाराष्ट्रातील कोकण पट्ट्यात अशी अनेक सुंदर पर्यटनस्थळं आहेत, जिथे निळाशार समुद्र, हिरवीगार झाडं, स्वच्छ किनारे आणि स्वादिष्ट कोकणी खाद्यपदार्थांचा एकत्रित अनुभव घेता येतो.

2 / 5
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीला ‘कोकणचे महाबळेश्वर’ म्हटलं जातं. समुद्रकिनाऱ्यांसोबतच आल्हाददायक हवामानामुळे हे ठिकाण पर्यटकांच्या पसंतीस उतरते. मे महिन्यातही येथे उकाडा तुलनेने कमी जाणवतो.

3 / 5
दापोलीजवळील कार्डे बीचआणि मुरुड बीच हे समुद्रकिनारे विशेष प्रसिद्ध आहेत. येथे समुद्रकिनारी निवांत फिरण्यासोबतच वॉटर स्पोर्ट्सचाही आनंद घेता येतो. शांत वातावरण आणि थंड वाऱ्यामुळे दापोली हे समर ट्रिपसाठी उत्तम ठिकाणं मानले जाते.

4 / 5
कोकणातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक म्हणजे गणपतीपुळे. येथे असलेले स्वयंभू गणपती मंदिर भाविकांसाठी श्रद्धास्थान आहे. पण धार्मिक महत्त्वासोबतच येथील समुद्रकिनाराही पर्यटकांना आकर्षित करतो.

5 / 5
जर तुम्हाला साहसी पर्यटनाची आवड असेल, तर मालवण तुमच्यासाठी परफेक्ट ठिकाण आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे शहर आपल्या स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांसाठी आणि वॉटर अॅक्टिव्हिटीजसाठी प्रसिद्ध आहे.

Follow Us