तुळशीजवळ दिवा लावण्यासाठी कोणत्या 2 वेळा सर्वोत्तम, लक्ष्मी प्राप्तीसाठी आजच करा बदल

तुळशीजवळ दिवा लावण्याची सर्वात शुभ वेळ कोणती आणि दिवा लावताना कोणत्या चुका टाळाव्यात? वाचा सविस्तर शास्त्रोक्त माहिती.

| Updated on: May 05, 2026 | 3:09 PM
1 / 8
हिंदू धर्मात तुळशीच्या पूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्याने केवळ घरातील अंधारच दूर होत नाही, तर नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सुख-समृद्धीचा मार्ग मोकळा होतो.

2 / 8
मात्र, हा दिवा लावताना वेळेचे भान राखणे अत्यंत आवश्यक आहे. चुकीच्या वेळी लावलेला दिवा लाभाऐवजी तुमचे नुकसान करु शकतो. तुळशीजवळ दिवा लावण्यासाठी दिवसातून दोन वेळा सर्वोत्तम मानल्या जातात.

3 / 8
सकाळी सूर्योदयापूर्वी म्हणजेच पहाटे ४ ते ५.३० या ब्रह्म मुहूर्तावर दिवा लावणे अत्यंत फलदायी मानले जाते. या वेळी दिवा लावून तुळशीची पूजा केल्यास घरात आध्यात्मिक शक्ती वाढते आणि मन प्रसन्न राहते.

4 / 8
तुळशीजवळ दिवा लावण्याची सर्वात महत्त्वाची वेळ म्हणजे सूर्यास्तानंतरचा काळ. संध्याकाळी तिन्हीसांजेला जेव्हा गाई गोठ्यात परततात, तेव्हा तुळशी जवळ दिवा लावावा, यामुळे देवी लक्ष्मीचे घरात आगमन होते, अशी मान्यता आहे.

5 / 8
अंधार पडण्यापूर्वी किंवा नंतर शक्यतो सूर्यास्त होताच तुळशीजवळ दिवा लावावा. रात्री उशिरा ९ वाजेनंतर तुळशीजवळ दिवा लावणे टाळावे. संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावताना एका गोष्टीची विशेष काळजी घ्या की, या काळात तुळशीच्या रोपाला स्पर्श करू नये.

6 / 8
शास्त्रानुसार सूर्यास्तानंतर तुळशीला स्पर्श करणे किंवा तिची पाने तोडणे निषिद्ध मानले जाते. संध्याकाळी दिवा लावल्यानंतर तुळशीला प्रदक्षिणा घालणे शुभ असते.

7 / 8
जर जागा कमी असेल, तर स्वतःभोवती फिरून प्रदक्षिणा पूर्ण करावी. तुळशीजवळ दिवा लावताना त्याचे तोंड शक्यतो पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे, ज्यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो.

8 / 8
धार्मिक ग्रंथांनुसार, जो भक्त नियमितपणे संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावतो. त्याच्यावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सदैव कृपा राहते. यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतात आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढते.

Follow Us