पंचायत, द फॅमिली मॅनपेक्षाही तगडी रेटिंग; 6 वर्षांपासून कोणीच मोडू शकलं नाही रेकॉर्ड

Top Rated Web Series: वीकेंड सुरू होणार आहे आणि आम्ही तुम्हा एका अशा वेब सीरिजबद्दल सांगणार आहोत, ज्याचा रेकॉर्ड अद्याप कोणी मोडू शकलेलं नाही. ही सीरिज सध्या सोनी लिव या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होत आहे.

| Updated on: Jun 25, 2026 | 8:52 AM
1 / 5
ओटीटीवरील उत्तम वेब सीरिजची जेव्हा चर्चा होते, तेव्हा सर्वसामान्यपणे 'पंचायत', 'द फॅमिली मॅन', 'मिर्झापूर', 'पाताल लोक' यांसारख्यांचा उल्लेख सर्वप्रथम होतो. या वेब सीरिजनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं असून त्यांना 'कल्ट' सीरिज म्हटलं जातं. मात्र एक अशीही सीरिज आहे, ज्याची रेटिंग या सर्वांपेक्षा जास्त आहे.

2 / 5
विशेष म्हणजे गेल्या सहा वर्षांपासून या वेब सीरिजचा रेकॉर्ड कोणालाच मोडता आला नाही. हंसल मेहता दिग्दर्शित या मास्टरपीसचं नाव आहे 'स्कॅम 1992: द हर्षद मेहता स्टोरी'. या सीरिजला आयएमडीबीवर दहापैकी 9.2 इतकी दमदार रेटिंग मिळाली आहे.

3 / 5
टॉप रेटिंगचे सीरिज- स्कॅम 1992: द हर्षद मेहता स्टोरीला 9.2/10, गुल्लक या सीरिजला 9.1/10, एस्पिरेंट्सला 9.1/10, पंचायतला 9.0/10, द फॅमिली मॅनला 8.7/10 आणि मिर्झापूरला 8.5/10 इतकी रेटिंग मिळाली आहे.

4 / 5
2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या या वेब सीरिजला आता सहा वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र आजपर्यंत हिंदीमध्ये या सीरिजच्या रेटिंगला कोणीच पार करू शकलं नाही. या सीरिजच्या यशाचं श्रेय अभिनेता प्रतीक गांधीला जातं. हर्षद मेहताच्या भूमिकेत त्याने कमाल अभिनय केला आहे.

5 / 5
'स्कॅम 1992'च्या प्रचंड यशानंतर हंसल मेहता आणि सोनी लिवने पुन्हा एकत्र येऊन 'स्कॅम 2003 : द तेलगी स्टोरी' प्रेक्षकांच्या भेटीला आणली. मात्र या सीरिजला हर्षद मेहताच्या सीरिजइतकं यश मिळू शकलं नाही. भारतीय इतिहासातील सर्वांत मोठ्या स्टॅम्प पेपर घोटाळ्याचा सूत्रधार अब्दुल करीम तेलगी याच्यावर आधारित या सीरिजला आयएमडीबीवर फक्त 7.9 रेटिंग मिळाली आहे.

Follow Us