लग्नाच्या २२ वर्षांनंतर प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीचा मोडला संसार, स्वत: केला खुलासा

या प्रसिद्ध अभिनेत्रीने घटस्फोटानंतर पतीकडून किंवा त्याच्या कुटुंबीयांकडून काहीही घेतलेले नाही. याबाबत तिने स्वत: माहिती दिली आहे.

| Updated on: Mar 04, 2025 | 6:17 PM
1 / 5
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे 'भाभीजी घर पर हैं.' या मालिकेत अंगुरी भाभीच्या भूमिके दिसणारी अभिनेत्री शुभांगी अत्रे सर्वांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसते. तिने दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. शुभांगीच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आले आहे. तिने घटस्फोट घेतल्याचे समोर आले आहे.

2 / 5
२००३मध्ये शुभांगीने पियुष पुरेसोबत लग्न केले होते. लग्नाच्या काही वर्षानंतर त्यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला आहे. आता त्यांनी लग्नाच्या २२ वर्षांनंतर घटस्फोट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

3 / 5
शुभांगीने नुकताच एका वृत्तावाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ती म्हणाली की, 'हे खूप वेदनादायी आहे. मी या नात्यात पूर्णपणे गुंतले होते. काही वर्षांनंतर माझ्यात आणि पियुषमध्ये खूप बदल होऊ लागले, पण आता मी या नात्यातून बाहेर पडले आहे. त्यामुळे आता मला खूप हलकं वाटत आहे. माझ्यावरील एक ओझं दूर झाले आहे.'

4 / 5
पुढे शुभांगी म्हणाली, 'मला स्वातंत्र्य मिळाले आहे. माझ्या भावना व्यक्त करणे माझ्यासाठी कठीण आहे. आता मला माझी मुलगी आशीवर पूर्ण लक्ष द्यायचे आहे, जेणेकरून ती तिच्या आयुष्यात नेहमी आनंदी राहील.'

5 / 5
शुभांगीने मुलीच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी घेतली आहे. तिने घटस्फोटानंतर पतीकडून किंवा त्याच्या कुटुंबाकडून काहीच मागितलेले नाही.