AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छत्रपती संभाजीनगरमध्ये जन्म, गरिबीत काढलं बालपण; ऐश्वर्याइतकी सुंदर दिसणाऱ्या या अभिनेत्रीने बदललं नशीब

या 27 वर्षीय मराठमोळ्या अभिनेत्रीने तिच्या लहानपणी आई-वडिलांना बरंच संघर्ष करताना पाहिलं आहे. अगदी पैशापैशाचा हिशोब ठेवणाऱ्या आईवडिलांचं नाव मोठं करायचं आहे, असं तिचं स्वप्न होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली आहे.

| Updated on: Jul 14, 2026 | 11:44 AM
Share
महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमध्ये जन्मलेल्या अभिनेत्री भाग्यश्री बोरसेनं स्वत:च्या मेहनतीच्या जोरावर अभिनयक्षेत्रात नाव कमावलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने लहानपणापासून केलेल्या संघर्षाचा खुलासा केला आहे. भाग्यश्रीचा जन्म एका 'लोअर मिडल क्लास' कुटुंबात झाला आणि तिच्या जन्मानंतर लगेचच तिच्या वडिलांची नोकरी गेली होती.

1 / 5
'ऑनेस्ट टाऊनहॉल'ला दिलेल्या मुलाखतीत भाग्यश्री म्हणाली, "मी जन्मापासूनच आयुष्याची एक वेगळी बाजू पाहिली ाहे. आजकाल कुटुंबांमध्ये जशी स्थिरता दिसते, तशी मी कधीही पाहिली नव्हती. माझ्या आईवडिलांना मी नेहमीच अडचणींचा सामना करताना पाहिलंय. आम्ही शून्यातून सुरुवात करून इथपर्यंत पोहोचलो आहोत. मी माझ्या पालकांना दहा रुपयांना मिळणाऱ्या हिरव्या मिरच्या आणि दहा रुपयांच्या पालकच्या जुडीच्या किमतीचाही हिशोब ठेवताना पाहिलं आहे."

2 / 5
"तेव्हा परिस्थिती अशी होती की जर आम्ही एका आठवड्यात 300 रुपये खर्च केले, तर पुढचा आठवडा कसा काढायचा, हा प्रश्न होता. मी माझ्या वडिलांना कोणाला तरी असं म्हणताना ऐकलं की, कृपया मला नोकरी द्या, मला दोन मुली आहेत. आपल्या वडिलांनी असं बोलावं असं कोणत्याच मुलीला वाटणार नाही. माझ्या मनात फक्त एकच विचार होता की माझ्या वडिलांसोबत असं पुन्हा कधीही घडू नये", असं तिने सांगितलं.

3 / 5
"माझ्या आई-वडिलांची मान नेहमी अभिमानाने उंचावलेली राहील, यासाठी मला मोठी झाल्यावर काम करायचं होतं. या घटनेनं मला आयुष्यात पुढे जाण्याची प्रेरणा दिली. माझी आज जी काही महत्त्वाकांक्षा आहे, ती माझ्या आई-वडिलांसाठीच आहे", अशा शब्दांत भाग्यश्री व्यक्त झाली.

4 / 5
भाग्यश्री बोरसेनं 2023 मध्ये 'यारियाँ 2' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ती कार्तिक आर्यनसोबत 'चंदू चॅम्पियन'मध्ये दिसली. सध्या भाग्यश्री तेलुगू आणि तमिळ चित्रपटसृष्टीत नाव कमावतेय. गेल्या दोन वर्षांत तिने पाच तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

5 / 5
Follow Us
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा