भीमाशंकर रोडवर भीषण दुर्घटना ! कार 200 फूट दरीत कोसळली, दोघांचा मृत्यू

भीमाशंकर रोडवरील पोखरी घाटात भीषण कार अपघात झाला. एक कार 200 फूट खोल दरीत कोसळल्याने दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले.

| Updated on: Oct 28, 2026 | 6:55 PM
1 / 5
भीमाशंकर रोडवरील पोखरी घाटात भीषण अपघात झाला. या घाटात एक कार थेट सुमारे 200 फूट खोल दरीत कोसळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

भीमाशंकर रोडवरील पोखरी घाटात भीषण अपघात झाला. या घाटात एक कार थेट सुमारे 200 फूट खोल दरीत कोसळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

2 / 5

प्राथमिक माहितीनुसार, भीमाशंकरच्या पोखरी घाटातून प्रवास करत असताना कारचा अपघात झाला. कार सुमारे 200 फूट खोल दरीत कोसळल्याने दोघांनी जीव गमावला तर काही प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. मात्र, हा अपघात नेमका कशामुळे झाला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

3 / 5

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांना मदत करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी प्रयत्न सुरू केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता बचावकार्याला वेग देण्यात आला.

4 / 5

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि बचाव पथकाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

5 / 5

या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची नावं, त्यांचे मूळ गाव तसेच जखमींची ओळख याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. कारमध्ये प्रवास करणारे नागरिक नेमके कुठले होते, याचाही तपशील समोर आलेला नाही. पोखरी घाटातील या भीषण अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून, दोन जणांच्या मृत्यूमुळे नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताचे नेमके कारण काय, याबाबत अधिकृत माहिती समोर येणे बाकी आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us