Sadhvi Harsha : महाकुंभमधून फेमस झालेल्या सुंदर साध्वी हर्षाच्या मनात आयुष्य संपवण्याचा विचार, असं का?
Sadhvi Harsha : प्रयागराज महाकुंभमधून साध्वी हर्षाला प्रसिद्ध मिळाली. सौंदर्यामुळे तिने सर्वांच लक्ष वेधून घेतलं. आता हर्षा रिछारियाने सोशल मीडियावर एक पोस्ट केलीय. त्यात तिच दु:ख दिसून आलय. महाकुंभमधल्या या वायरल साध्वी सोबत काय झालय जाणून घेऊया.

महाकुंभ दरम्यान आपल्या सौंदर्यामुळे चर्चेत आलेल्या साध्वी हर्षा रिछारिया बद्दल एक बातमी समोर आलीय. हर्षाने थेट आयुष्य संपवण्याची धमकी दिली आहे. तिने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करुन यामागच कारण सांगितलय. व्हिडिओमध्ये हर्षाने रडत, रडत आपलं दु:ख सांगितलय.

"माझ्या ओळखीचे काही लोक माझे खोटे व्हिडिओ शेअर करत आहेत. या खोट्या व्हिडिओंद्वारे माझी बदनामी सुरु आहे. जे लोक हे व्हिडिओ करतायत, त्यांची नावं माझ्याकडे आली आहेत" असं हर्षा रिछारियाने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.

"मी या सगळ्याला इतकी कंटाळलीय की, मला जीवन संपवून टाकावं असं वाटत आहे. मी माझं जीवन संपवलं, तर चिठ्ठीमध्ये त्यांचं नाव लिहून जाईन. सर्वांना सांगेन कोणी माझ्यासोबत काय केलय?" असं साध्वी हर्षा या व्हिडिओमध्ये बोलताना दिसतेय.

"मी महाकुंभमध्ये प्रतिज्ञा केलीय. हिंदुत्व सनातनचा काम करण्याचा संकल्प केला आहे. धार्मिक संस्कृतीसाठी युवकांना जागरुक करण्याच काम करीन. पण काही धर्म विरोधी लोक मला पुढे जाण्यापासून रोखत आहेत. माझे जुने व्हिडिओ काढले जात आहेत. ही कशी साध्वी बनू शकते? असं विचारतायत. मी साध्वी आहे असं मी कधी म्हटलेलं नाही" असं हर्षा रिछारिया म्हणाली.

"माझे काही AI द्वारे बनवलेले व्हिडिओ सर्कुलेट होत आहेत. रोज 15 ते 20 मेसेज येत आहेत. काही लोकांना एका मुलीच पुढे जाणं पटलेलं नाही. एखाद्या दिवशी हर्षा रिछारियाने जीवन संपवल्याची बातमी समजली, तर कोणी माझ्यासोबत काय-काय केलय, मी सगळ्यांची नाव लिहून जाईन. महादेवाने मला जितकी हिम्मत दिलीय, मी लढत राहीन" असं हर्षा रिछारिया म्हणाली.