बेस्ट बसच्या अपघातांचे सत्र सुरूच, 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, अपघाताचे भयावह फोटो समोर

घरातून बाहेर निघाल्यानंतर काय होईल याबद्दल काहीच सांगता येत नाही, आता देखील असंच काही घडलं आहे. कामासाठी बाहेर निघालेल्या व्यक्तीवर काळाचा घाला होईल, याची त्याला देखील कल्पना नव्हती. मुंबईच्या मानखुर्द येथे सायन पनवेल हायवेवर आज सकाळी एक मोठा अपघात झाला. यामध्ये 65 वर्षीय व्यक्तीने अखेरचा श्वास घेतला.

| Updated on: Jul 20, 2026 | 12:17 PM
1 / 5
सायन-पनवेल महामार्गावर मानखुर्द येथील विश्वकर्मा रुग्णालयासमोर सोमवारी सकाळी BESTच्या 501 क्रमांकाच्या बसचा भीषण अपघात झाला. या अपघाताचे फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बसचा वाहक आणि चालक गंभीर जखमी आहेत.

2 / 5
मुंबईच्या मानखुर्द येथे सायन पनवेल हायवेवर आज सकाळी एक मोठा अपघात झाला. BEST ची बस रस्त्यावरील डिव्हायडरला धडकली. हा अपघात आज सकाळी 9 वाजून 14 मिनिटांनी विश्वकर्मा हॉस्पिटलसमोर झाला. अपघात BEST ची रूट क्रमांक 501 ची बस डिव्हायडरला धडकली.

3 / 5
राजावाडी हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या गंभीर अपघात 3 जण जखमी झाले. त्यापैकी 65 वर्षीय भास्कर रावसाहेब पांडे यांना मृत घोषित करण्यात आले असून ते अपघाताच्या वेळी डिव्हायडरजवळ उभे होते.

4 / 5
बसचे वाहक वैभव वाघमारे आणि चालक बनवारी शर्मा यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पण अपघाताचं नेमकं कारण अस्पष्ट असून पोलीस कसून चौकशी करत आहेत.

5 / 5
मिळालेल्या माहितीनुसार, बस चालकाचं नाव श्रीराम प्रसाद शर्मा  आणि बस वाहक वैभव वाघमारे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. पण सतत होणाऱ्या अपघातांचं नेमकं कारण काय? याचा शोध घेणं फार गरजेचं आहे.

Follow Us