Big Boss 18 : ‘माझ्या नवऱ्याकडे जितका पैसा, तितका माझ्या वडिलांकडे…’, अभिनेत्री काय म्हणाली?
Big Boss 18 : श्रुतिका अर्जुनला आपल्या वडिलांसाठी घर विकत घ्यायचं आहे. तिच्या आईला फिरण्याची हौस आहे. म्हणून तिला आपल्या आईला वर्ल्ड टूरला घेऊन जायचं आहे.
1 / 5

बिग बॉस 18 मध्ये हायवोल्टेज ड्रामा पहायला मिळतोय. या सगळ्या भांडणात, वादात दक्षिणेची अभिनेत्री श्रुतिका अर्जुन आपल्या खास अंदाजात फॅन्सना हसवतेय.
2 / 5

पण शो मध्ये आता श्रुतिका अर्जुन वडिलांनी तिच्यासाठी जे केलं, त्या आठवणीने इमोशनल झाली. ती भरपूर रडली सुद्धा.
3 / 5

पालकांच्या आठवणीत श्रुतिका म्हणाली की, मी माझ्या आई-वडिलांना खूप मिस करतेय. कधी त्यांच्याशिवाय राहिली नाहीय.
4 / 5

माझ्या नवऱ्याकडे जितका पैसा आहे, तितके माझे वडील श्रीमंत नाहीत. मला लग्नासाठी वडिलांनी त्यांची सगळी कमाई लावली. माझा भावाने एकदाही विचारलं नाही की, त्याच्यासाठी काय ठेवलय.
5 / 5

माझ्या लग्नासाठी वडिलांनी जे कर्ज काढलेलं, ते अजूनही फेडतायत असं श्रुतिका अर्जुन म्हणाली.
Follow Us