AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Love Life : 5 लग्न 5 घटस्फोट, भावानेच पळवली गर्लफ्रेंड, बॉलिवूडच्या या ‘रिअल हिरो’ची लव्हस्टोरी वाचून थक्क व्हाल!

Love Life : बॉलिवूड सेलिब्रिटी कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. आता देखील बॉलिवूडच्या एका रियल हिरोची लव्हस्टोरी चर्चेत आहे, ज्याची गर्लफ्रेंड भावानेच पळवलेली...

Love Life : 5 लग्न 5 घटस्फोट, भावानेच पळवली गर्लफ्रेंड, बॉलिवूडच्या या 'रिअल हिरो'ची लव्हस्टोरी वाचून थक्क व्हाल!
| Updated on: Oct 31, 2026 | 1:25 PM
Share

Love Life : सध्या ज्या सेलिब्रिटीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, ते दुसरे तिसरे कोणी नाही तर, आय.एस. जोहर यांची आहेत. त्यांच्या आयुष्यात अशा अनेक घटना घडल्या ज्या ऐकून तुम्हाला देखील फार मोठा धक्का बसेल. त्यांच्या भावानेच त्यांची गर्लफ्रेंड देखील पळवली. तर जाणून घ्या, करण जोहर याचे काका आय. एस. जोहर यांच्या खासगी आयुष्यातील काही खास किस्से.

आय. एस. जोहर उच्च शिकलेले होते. त्यांनी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांत पदव्युत्तर पदवी (Master’s Degree) मिळवली होती, तसेच एलएलबीचे (LLB) शिक्षणही पूर्ण केलं होतं. करण जोहरचे वडील यश जोहर हे त्यांचे मोठे भाऊ होते. याशिवाय, त्यांना एक जुळा भाऊसुद्धा होता. आय. एस. जोहर त्यांच्या जुळ्या भावासारखे इतके दिसायचे की, जेव्हा जेव्हा त्यांचा भाऊ काही खोडकरपणा करून पळून जायचा, तेव्हा वडील आय. एस. जोहर यांनाच शिक्षा द्यायचे.

जेव्हा त्यांचा भाऊ मोठा झाला तेव्हा तो गैरवर्तन करु लागला. यामुळे पोलिसांनी त्यांना तुरुंगात टाकलं. जोहर यांना मोठा धक्का तेव्हा बसला, जेव्हा भावाने सारखेच दिसत असल्याचा फायदा उचलला आणि आय. एस. जोहर यांच्या गर्लफ्रेंडसोबत लग्न केलं. आय. एस. जोहर यांनी स्वतः 1957 मध्ये आयोजित ‘इंडियन फिल्म फेस्टिव्हल’मध्ये या घटनेचा उल्लेख केला होता. 1947 मध्ये भारत-पाकिस्तान फाळणीदरम्यान, आय. एस. जोहर आपल्या कुटुंबासह पटियाला येथे आले. दंगलींमुळे त्यांचं कुटुंब पुन्हा पाकिस्तानला परत जाऊ शकलं नाही.

5 लग्न 5 घटस्फोट

आय. एस. जोहर यांनी पाच वेळा लग्न केलं. पण त्यांचं कोणतंच लग्न फार काळ टिकलं नाही. 5 वेळा लग्न केल्यानंतर त्यांचे 5 वेळा घटस्फोट देखील झाले. अखेर त्यांनी सिनेविश्वात पदार्पण कणऱ्याचा निर्णय घेताल. 1949 मध्ये, ते सिनेसृष्टीत आपलं नशीब आजमावण्यासाठी मुंबईत आलं. त्यांनी सर्वात आधी सिनेमांसाठी कथा आणि संवादांचे लेखन करण्यास सुरुवात केली. ‘एक थी लडकी’ नावाचा एक सिनेमा होता, ज्याची कथा लिहिण्यासोबतच त्यांनी त्यात एक छोटी विनोदी भूमिकाही साकारली होती.

1984 मध्ये झालं निधन…

1984 मध्या आय. एस जोहर यांची प्रकृती खालावली. पाच वेळा लग्न, सिनेविश्वातील ओळखी, तरी देखील शेवटच्या क्षणी त्यांच्यासोबत कोणीच नव्हतं. पहिल्या पत्नीपासून त्यांना दोन मुलं होतं अंबिका आणि अनिल…, मुलं त्यांच्यासोबत राहत होती, त्यांनी मुलांनी सांगितलं होतं की, त्यांच्या निधनाबद्दल कोणाला माहिती नाही झालं पाहिजे… मुलांनी तेव्हा त्यांना फार महत्त्व दिलं नाही. पण त्यानंतर बरोबर दोन दिवसांनंतर म्हणजे, 10 मार्च 1984 रोजी आय. एस. जोहर यांचं निधन झालं.

Follow Us
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोल
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर उघडले
12 वर्षांची प्रतीक्षा संपली! सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर भाविकांसाठी खुले
शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने...
Nashik Simhastha Kumbh Mela : शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन्...
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन् गोदावरीच्या महाआरतीने मंगलमय वातावरण
सप्त नद्यांच्या पवित्र जलाने अभिषेक, देवतांचं आवाहन अन् ध्वजपूजन.....
Trimbakeshwar Kumbh Mela Flag Hoisting : सप्त नद्यांच्या पवित्र जलाने अभिषेक, देवतांचं आवाहन अन् ध्वजपूजन; त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याचा विधिवत प्रारंभ
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा भव्य ध्वजारोहण सोहळा
Simhastha Kumbh Mela Nashik : नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा भव्य ध्वजारोहण सोहळा; कुंभपर्वाला सुरुवात
पूर्णेकर समर्थकांना मारहाण; ठाणे पोलीस पालकमंत्र्यांची धुणीभांडी करतात
Sanjay Raut : पूर्णेकर समर्थकांना मारहाण; ठाणे पोलीस पालकमंत्र्यांची धुणीभांडी करतात का? संजय राऊतांचा थेट सवाल
एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊच शकत नाही...;
Gunratna Sadavarte : एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊच शकत नाही...;  गुणरत्न सदावर्तेंचं गाण्यातून भाकीत
माझ्या लेव्हलला आलो तर महाराष्ट्रातही फिरु देणार नाही, रवींद्र धंगेकर
Ravindra Dhangekar : माझ्या लेव्हलला आलो तर महाराष्ट्रातही फिरु देणार नाही, रवींद्र धंगेकर यांनी नेमकं कोणाला सुनावलं?
ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर..
Kumbh Mela Update : ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर आज भाविकांसाठी राहणार बंद