विवाहित क्रिकेटरसोबत लग्न करणार ही Bigg Boss फेम ग्लॅमरस अभिनेत्री! नात्याचं सत्य अखेर समोर

क्रिकेटर आणि अभिनेत्री यांच्या नात्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. अनेक असे क्रिकेटर आहेत ज्यांनी अभिनेत्रींसोबत लग्न केलं आहे. आता देखील लोकप्रिय क्रिकेटर आणि बिग बॉस फेम अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. आहे. विवाहित क्रिकेटरसोबत रंगत असलेल्या अफेअरच्या चर्चांवर खुद्द अभिनेत्रीने स्पष्टीकरण दिल आहे.

| Updated on: Aug 13, 2026 | 1:02 PM
1 / 5
सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून बिग बॉस अभिनेत्री अर्शी खान आहे. तिच्या अफेअरच्या चर्चा अफगानी क्रिकेटर अफताब आलम याच्यासोबत रंगत आहे...

सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून बिग बॉस अभिनेत्री अर्शी खान आहे. तिच्या अफेअरच्या चर्चा अफगानी क्रिकेटर अफताब आलम याच्यासोबत रंगत आहे...

2 / 5

यावर खुद्द अर्शी हिने मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्री म्हणाली अफताब याचं लग्न झालं आहे आणि त्याच्यासोबत माझं भविष्य काहीच नाही... असं अभिनेत्री म्हणाली. एका मुलाखतीत अभिनेत्रीने सांगितलं की, 2020 पासून अर्शी, अफताब याला ओळखते.

3 / 5

दोघांच्या नात्यावर रंगणाऱ्या चर्चांवर अभिनेत्री म्हणाली, 'आमचं नातं फार चांगलं आहे. आमची मैत्री खास आहे... त्याच्यासोबत माझं लग्न कधीच होऊ शकत नाही. कारण अफताब विवाहित आहे आणि त्याला 5 मुलं आहेत...', असं म्हणत अभिनेत्रीने रंगणाऱ्या चर्चांना पूर्णविराम दिला.

4 / 5

यावेळी लग्नाबद्दल अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे. 'मी माझ्या लग्नाचा देखावा करणार नाही. मी गुपचूप कोर्ट मॅरिज करणार आहे.', अशात आता अभिनेत्री कोणासोबत लग्न करेल, हे येणाऱ्या काळात दिसेलच. पण अर्शी कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.

5 / 5

अभिनेत्री अर्शी हिला बिग बॉसमधून नवीन ओळख मिळाली. सोशल मीडियावर देखील अर्शी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us