बिग बॉस फेम अभिनेत्रीचा मोठा निर्णय; इंडस्ट्री सोडून या मार्गावर वाटचालीचा निर्णय

सोनियाच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, तिने 'डुबकी', 'शूरवीर', 'येस बॉस'मध्ये काम केलंय. ती काही म्युझिक व्हिडीओंमध्येही झळकली आहे. परंतु 'बिग बॉस 17'नंतर ती प्रकाशझोतात आली.

| Updated on: May 06, 2025 | 4:07 PM
1 / 5
'बिग बॉस 17'मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेली अभिनेत्री सोनिया बंसलने तिच्या करिअरशी संबंधित मोठा निर्णय घेतला आहे. तिने मनोरंजन विश्व सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सोनियाने अधिकृतरित्या इंडस्ट्री सोडण्याचं जाहीर केलं आहे. त्याचसोबत अध्यात्माच्या मार्गावर चालत असल्याचंही तिने स्पष्ट केलंय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने याविषयीचा खुलासा केला.

2 / 5
'ई टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत सोनिया म्हणाली, "मी सध्या आत्मशोध, शांती आणि जीवनाच्या उद्देश्यावर अधिक लक्ष केंद्रित करतेय. आपण दुसऱ्यांसाठी सर्वकाही करण्यात व्यस्त असतो, पण स्वत:लाच विसरतो."

3 / 5
"मला माझं अस्तित्त्वाच्या हेतूची जाणीवच नव्हती. परफेक्ट बनण्याच्या शर्यतीत, इतरांशी तुलना करत, सर्वाधिक पैसा कमावण्याच्या प्रयत्नांत मी स्वत:च गमावून बसले आहे. माझ्याकडे आज पैसा, प्रसिद्ध सर्वकाही आहे, पण शांती नाही. इतक्या पैशांचं मी काय करू, जर माझ्याकडे शांतीच नसेल", असा सवाल तिने केला.

4 / 5
"या भौतिक विश्वात तुमच्याकडे सर्वकाही असू शकतं. परंतु तुम्ही आतून पोकळ असता. हा आपल्या मनातील अत्यंत नकारात्मक आणि अंधार असलेला कोपरा आहे. आयुष्य म्हणजे काय, हे मला खऱ्या अर्थाने समजून घ्यायचंय. या इंडस्ट्रीने मला ओळख दिली, परंतु त्यातून मला स्थिरता मिळाली नाही", अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आहेत.

5 / 5
"ही इंडस्ट्री मला मोकळेपणे श्वास घेऊ देत नाही. आता मी आणखी दिखावा करू शकत नाही. मला वास्तविकतेत जगायचं आहे. मला लाइफ कोच आणि स्पिरिच्युअल हीलर बनायचं आहे. आयुष्य कधी कोणत्या वळणावर बदलेल हे कोणालाच माहीत नाही", असंही ती म्हणाली.