‘बिग बॉस मराठी 6’चं बिगुल वाजलं..; रितेश देशमुखच्या प्रोमोची जोरदार चर्चा, कोण असतील स्पर्धक?

बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनचं बिगुल वाजलं आहे. नवीन वर्षात 11 जानेवारीपासून दररोज रात्री 8 वाजता कलर्स मराठी जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिझनचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे.

| Updated on: Dec 14, 2025 | 11:04 AM
1 / 5
"स्वागताला दारं उघडी ठेवा.. मी येतोय" म्हणत अभिनेता रितेश देशमुख घेऊन येत आहे 'बिग बॉस मराठी'चा सहावा सिझन. या नव्या प्रोमोने प्रेक्षकांचं लक्ष वेधलंय. यामध्ये रितेशचा कडक लूक, दमदार स्वॅग पहायला मिळतोय.

2 / 5
"मागचा सिझन वाजवलाय, यंदाचा गाजवायचाय...आहात ना तयार" रितेशच्या या वाक्याने प्रेक्षकांची धडधड अजूनच वाढली आहे. नव्या सिझनची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मागील सिझनने जबरदस्त धुमशान घातलं आणि यंदाच्या सिझनमध्ये स्वॅग तोच असणार आहे.

3 / 5
सहाव्या सिझनचा पॅटर्न काय असणार? कसा लूक असणार? सदस्य कोण असणार? याबद्दलची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे. बिग बॉस मराठीचा सहावा सिझन येत्या 11 जानेवारीपासून दररोज रात्री 8 वाजता कलर्स मराठी वाहिनीवर आणि जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

4 / 5
रितेश देशमुखच्या एण्ट्रीसाठी उभारलेला आलिशान सेट, भव्य मिरवणुकीचं वातावरण, ढोल–ताशांचा गजर, रंगीबेरंगी रोषणाई आणि तब्बल 250 ते 300 लोकांची दणदणीत उपस्थिती या सगळ्यांच्या साक्षीने बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनचा लार्जर-दॅन-लाइफ प्रोमो पार पडला.

5 / 5
या प्रोमोमध्ये रितेश पारंपरिक वेशभूषेत दिसतोय. या नव्या प्रोमोने बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनचा बिगुल वाजला आहे. "घरात कुणाचा नवस पूर्ण होणार? तर कुणाच्या सलामीने वातावरण झिंगणार? काही असे ही असणार.. पण, मी गप्प नाही बसणार.." असे त्याचे डायलॉग चर्चेत आले आहेत.