ओपन बार डान्स करणाऱ्यांना चपलीने झोडायला हवे; मराठमोळ्या अभिनेत्रीचा गौतमी पाटीलकडे ईशारा?

एका मराठमोळ्या अभिनेत्रीने अश्लील कृत्य करणाऱ्या लावणी डान्सवर निशाणा साधला आहे. तिने अप्रत्यक्षपणे गौतमी पाटीलला सुनावले असल्याचे बोलले जात आहे.

| Updated on: Sep 24, 2026 | 8:22 AM
1 / 5
बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची विजेती आणि अभिनेत्री मेघा धाडे आपल्या रोखठोक आणि स्पष्ट वक्तव्यासाठी विशेष ओळखली जाते. ती अनेक सामाजिक विषयांवर बिनधास्त मत मांडताना दिसते. अलीकडे तिने लावणीच्या नावाखाली होणाऱ्या अश्लील डान्सबाबत बोलताना तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ती असा डान्स करणाऱ्या मुलींना चपलीने झोडायला हवे असे स्पष्ट म्हटले आहे.

2 / 5

मेघा धाडेने एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले की, आज ज्या मुली ओपन बार डान्स करत आहेत, त्यांना मला खरोखर चपलीने झोडावेसे वाटते. त्यांच्या आयोजकांनाही. मग ते कोणत्याही पक्षाचे आयोजक असोत मग.

3 / 5

पुढे मेघा म्हणाली की, बाप्पामुळे मला तोंडातून शब्द काढता येत नाहीत, पण या लोकांना वाटत असेल की यामुळे पक्षाचे चांगले होईल, लोक जमतील आणि कार्यक्रमांना प्रसिद्धी मिळेल, तर तो त्यांचा फार चुकीचा समज आहे. या पोरी, ज्या लावणीच्या नावाखाली खुलेआम बार डान्स करत आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत.

4 / 5

मेघाने सोशल मीडियावरील असा डान्स करणाऱ्या लावणी कलाकारांचे रील्स पाहूनही तीव्र नाराजी व्यक्त केली. पारंपरिक लावणी आणि लावणीच्या नावाखाली होणाऱ्या बार डान्स यांच्यातील फरकाबाबत चर्चा सुरू असताना तिने ही प्रतिक्रिया दिली आहे. तिच्या या विधानानंतर नेमका कोणावर निशाणा होता? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मेघाने नृत्यांगना गौतमी पाटीलला तर सुनावले नाही ना? अशी चर्चा रंगली आहे.

5 / 5

मेघा धाडेने पुढे अभिनेत्री केतकी चितळेचाही उल्लेख केला आहे. ती म्हणाली की, ती केतकी चितळे, जिला कविता केल्यामुळे 40 दिवस जेलमध्ये ठेवलं होतं.आणि यांचा हा जो नंगानाच चालू असतो स्टेजवर, ओपन बारडान्स! त्याच्याबद्दल काहीच कोणाचं म्हणण नाहीय का?

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us