Suraj Chavan : थाटात पार पडलं सुरज चव्हाणच्या पत्नीचं डोहाळेजेवण ! आत्या जान्हवी किल्लेकरची विशेष उपस्थिती

बिग बॉस मराठी 5 चे विजेतेपद मिळवलेला, प्रसिद्ध रीलस्टार सुरज चव्हाण आणि पत्नी संजनाच्या घरी लवकरच छोटा, गोड पाहुणा येणार आहे. संजनाची चोर ओटी भरल्याचा व्हिडीओ अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने नुकताच शेअर केला होता. त्यानंतर आता तिने सुरज-संजनाच्या डोहाळेजवणाचेही क्षण पोस्ट केले.

| Updated on: Jun 13, 2026 | 10:09 AM
1 / 6
'बिग बॉस मराठी 5'चा विजेता सुरज चव्हाण याच्या घरी लवकरच छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. सुरज आणि त्याची पत्नी संजना हे आई-बाबा होणार असून,अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने ही गुड न्यूज नुकतीच शेअर केली होती. बिग बॉस मराठीची माजी स्पर्धक जान्हवी किल्लेकरने तिची चोर ओटी भरली, त्याचा व्हिडीओ तिने शेअर केला होता. त्यानंतर ही बातमी सर्वांनाच समजली. सुरजनेही त्याच्या वॉलवर व्हिडीओ चटाकत सर्वांना गुड न्यूज दिली. त्यानंतर आता जान्हवीने आता आणखी एक गोड व्हिडीओ शेअर केला, तो सुरज-संजनाच्या डोहाळेजेवणाचा. (All Photos : Social Media)

2 / 6

बिग बॉस विजेता सूरज चव्हाण आणि संजना लवकरच आईबाबा होणार आहेत. नुकतचं संजनाच डोहाळेजवण थाटात पार पडलं. यावेळी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर आवर्जून उपस्थित होती. त्यावेळेचे गोड फोट आणि गोड क्षण तिने व्हिडीओतून शेअर केले. मी आत्या होणार आहे, म्हणत तिने सुरज संजनासोबतचा व्हिडीओ टाकला.

3 / 6

जान्हवीने प्रेमाने त्यांची नजरही काढली. तिचा हा व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला असून चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत भावी आई-बाबांना नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

4 / 6

हिरव्या रंगाची भरजरी साडी, फुलांचे दागिने, हातभरून मेहंदी, चेहऱ्यावर विलसणारं हास्य अशा स्वरूपात संजना खूप गोड दिसत होती. गरोदरपणाचा ग्लो तिच्या चेहऱ्यावर दिसत होता.

5 / 6

तर ऑफ व्हाईट रंगाचा कुर्ता पायजमा, आणि खास डिझाईन असलेले जॅकेट घातलेला सुरज चव्हाण हाही खूप खुश दिसत होता. सुरज आणि संजनाचे खास क्षण या व्हिडीओत सुंदर कॅप्चर झालेत. चाहत्यांनी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या.

6 / 6

सूरज चव्हाण आणि संजना गोफणे यांनी नोव्हेंबर 2025 मध्ये लग्न केलं. अत्यंत थाटात हा विवाह पार पडला होता. संजना ही सूरजची मामेबहीण आहे. या दोघांच्या लग्नालाही जान्हवी आवर्जून उपस्थित होती, हळद, मेहंदी, लग्नाचे फोटो, व्हिडीओ तिने शेअर केले होते. बिग बॉस मराठी सीझन 5 च्या काही मंडळीनीही लग्नाला हजेरी लावली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us