
बिग बॉस OTT 3 मध्ये सहभागी झाल्यामुळे प्रसिद्ध झालेल्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर चंद्रिका दीक्षित (ज्यांना 'वडापाव गर्ल' म्हणूनही ओळखले जाते) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. एका पॉडकास्टमध्ये दिलेल्या मुलाखतीत तिने अत्यंत वादग्रस्त विधान केले. हे विधान सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे.

पॉडकास्टमध्ये बोलताना चंद्रिका म्हणाल्या, “मला काहीही लाज वाटणार नाही. एक आई म्हणून मी खूप मोठी गोष्ट सांगते आहे. लोक मला कितीही जज करतील, पण माझ्या मुलाला सांभाळण्यासाठी आणि त्याला चांगले आयुष्य देण्यासाठी कुणासोबत झोपावं लागलं तरी मी झोपेन आणि पैसे कमवेन.” हे बोलताना ती अतिशय भावनिक झाली आणि रडू लागली.

चंद्रिका दीक्षितचे लग्न झाले असून तिला एक मुलगा आहे. सध्या तिचे वैवाहिक जीवन मोठ्या वादात आहे. तिने नवऱ्यावर फसवणुकीचा (extramarital affair) आरोप लावला आहे. यानंतर एका ‘मिस्ट्री मॅन’सोबत लग्न केल्याचे फोटो व्हायरल झाले होते, ज्यामुळे घटस्फोट न देता दुसरे लग्न केल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र चंद्रिकाने हे आरोप फेटाळले आहेत.

दिल्लीत वडापावचा स्टॉल चालवणाऱ्या चंद्रिका प्रथम ‘वडापाव गर्ल’ म्हणून रातोरात प्रसिद्धी मिळाली. मेहनतीने सुरू केलेला हा छोटासा व्यवसाय सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिला बिग बॉस OTT 3 मध्ये प्रवेश मिळाला. आता त्याच चंद्रिकाच्या या विधानाने नेटिझन्समध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

सोशल मीडियावर अनेकांनी तिच्या विधानावर टीका केली आहे. काहींनी तिला ट्रोल केले, तर काहींनी याला ‘नौटंकी’ आणि ‘प्रसिद्धीसाठी केलेले ड्रामा’ म्हटले आहे. अनेकांनी सल्ला दिला की, “मुलासाठी एवढ्या खालच्या थराला जाण्यापेक्षा कठोर परिश्रम करा आणि स्वाभिमानाने जगणे शिका.”

चंद्रिकाचे हे विधान सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे आणि चर्चेत देखील आहे. त्यांच्या वैयक्तिक जीवनातील वाद आणि आता हे नवे विधान यामुळे ती पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.