
प्रसिद्ध युट्यूबर अरमान मलिकने दोघींशी लग्न केलं असून आपल्या दोन्ही पत्नींसोबत तो 'बिग बॉस ओटीटी'च्या तिसऱ्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. अरमानने आधी पायलशी लग्न केलं. त्यानंतर तिचीच खास मैत्रीण कृतिकाशी त्याने दुसरं लग्न केलं.

अरमान मलिकला पायलकडून तीन मुलं आणि कृतिकाकडून एक मुलगा आहे. चार मुलांना घरी सोडून तो पत्नींसोबत बिग बॉसच्या घरात आल्याने नेटकऱ्यांनी ट्रोलिंगला सुरुवात केली आहे. पैशांसाठी इतक्या लहान मुलांना घरी नॅनींच्या भरोश्यावर सोडल्याची टीका नेटकऱ्यांनी केली.

अरमानने त्याच्या चार मुलांना घरी आठ नॅनींच्या भरोश्यावर सोडलं आहे. इतकंच नव्हे तर तब्बल 28 लोकांची टीम अरमानच्या मुलांचा सांभाळ करतेय. यासाठी तो बराच पैसा खर्च करतोय.

अरमान आणि त्याच्या दोन्ही पत्नी बिग बॉसच्या घरात असल्या तरी त्यांच्या टीमकडून मुलांचे व्लॉग नियमितपणे युट्यूब चॅनलवर पोस्ट केले जात आहेत. युट्यूब चॅनलद्वारे अरमानची चांगली कमाई होते.

युट्यूबर म्हणून नाव कमावण्याआधी अरमानने अनेक छोटी-मोठी कामं केली आहेत. एका मुलाखतीत अरमानने त्याची एकूण संपत्ती किती आहे, याविषयी सांगितलं होतं. तो म्हणाला, "आजच्या घडीला माझी संपत्ती 100 ते 200 कोटींच्या घरात असेल."