
बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांना त्यांच्या रंगावरून टिका करण्यात आली. मात्र, पुढे जाऊन याच अभिनेत्रींनी त्यांच्या लुकमध्ये बदल अनेकांना धक्का देखील दिला आहे.

आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जिला तिच्या सावळ्या रंगावरून अनेकांनी टोमणे मारले. पण आज तिच अभिनेत्री तिच्या हॉट लुक आणि सौंदर्यामुळे चर्चेत आहे.

आम्ही बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसु हिच्याबद्दल बोलत आहोत. जिने नुकताच तिचा 47 वा वाढदिवस साजरा केला असून सेलिब्रेशनची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

बिपाशा बसुने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती पती अभिनेता करण सिंग ग्रोव्हर आणि लेक देवीसोबत मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे.

बिपाशाने आपला वाढदिवस कुटुंबासोबत अगदी खास पद्धतीने साजरा केला. यावेळी दोघेही समुद्रकिनारी रोमँटिक अंदाजामध्ये दिसले. चाहत्यांची मने जिंकली आहेत.