
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल आज (30 ऑक्टोबर) लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे.

काजलने आपल्या लग्नाची जय्यत तयारी केली असून सध्या सोशल मीडियावर तिच्याच लग्नाची चर्चा होताना दिसत आहे.

29 ऑक्टोबरपासून काजल तिच्या लग्नाच्या तयारीत गुंतलेली आहे. काल मुंबईत तिच्या लग्नानिमित्त मोठा समारंभही आयोजित करण्यात आला होता.

काजल अग्रवाल गौतम किचलूसोबत लग्न करणार आहे. तशी माहिती तिने 6 ऑक्टोबरला सोशल मीडियाद्वारे दिली होती.

लग्नसंमारंभात जाण्याआधी काजलने माध्यमांशी संवाद साधला. तसेच आपल्या चाहत्यांचेही आभार मानले.

काळ्या रंगाचा चष्मा, हातावर मेहंदी आणि गुलाबी रंगाचा ड्रेस अशा पेहरावात काजल यावेळी स्पॉट झाली.

काजलसोबत यावेळी तिची आईसुद्धा पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. काजलच्या आईनेदेखील माध्यमांचे तसेच आपल्या मुलीच्या चाहत्यांचे आभार मानले.

काजल दाक्षिणात्य तसेच बॉलिवूड चित्रपटसृष्टीत एक आघाडीची अभिनेत्री असून आजपासून ती वैवाहिक जीवनात पदार्पण करणार आहे.

काजल सध्या लग्नासाठी तिच्या घरातून निघाली असून ती गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये जास्तच क्यूट दिसत आहे.