
काळी मिरी हा स्वयंपाकघरातील एक सामान्य मसाला आहे. जेवणात काळी मिरीचा समावेश केल्याने जेवण चवदार बनते शिवाय ते आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

दररोज दोन काळी मिरी खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या या दूर होण्यास मदत होते. मॅग्नेशियम, तांबे, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम काळी मिरीत असते.

दररोज दोन काळी मिरीचे दाणे खाल्ल्याने पचनसंस्था सुधारते. यामुळे ज्यांना पचनाचा त्रास आहे, अशांनी आपल्या आहारात याचा समावेश करावा.

विशेष म्हणजे वजन कमी करण्यासाठीही काळी मिरी अत्यंत फायदेशीर आहेत. यामुळे वजन झटपट कमी होण्यास मदत होते.

सर्दी आणि खोकल्यासारख्या समस्यांवर नैसर्गिक उपाय म्हणून काळी मिरी सेवन प्रभावी ठरते. काळी मिरीमुळे सर्दी खोकल्याचा त्रास कमी होतो.