
भारतीय संस्कृती आणि ज्योतिषशास्त्रात 'नजर दोष' ही एक सामान्य धारणा आहे. असे मानले जाते की काही लोकांच्या नकारात्मक उर्जेचा एखाद्या व्यक्तीवर, वस्तूवर किंवा अगदी एखाद्या जागेवर वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणूनच ते टाळण्यासाठी लोक अनेक उपाय करतात, त्यापैकी एक म्हणजे काळा धागा घालणे. पायात काळा धागा घालण्याची परंपरा खूप जुनी आहे. यामागील विश्वास असा की जेव्हा कोणी तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा किंवा यशाचा हेवा करतो तेव्हा त्यांची नकारात्मक ऊर्जा प्रथम तुमच्या पायांमधून शरीरात प्रवेश करते. काळा धागा या नकारात्मक उर्जेला शरीरात प्रवेश करण्यापासून रोखतो.

ज्योतिष आणि धार्मिक श्रद्धा - ज्योतिषशास्त्रात काळा रंग शनीचे प्रतीक मानला जातो. शनीला न्यायाची देवता आणि वाईट शक्तींना नियंत्रित करणारा मानला जातो. म्हणून, पायावर काळा धागा बांधल्याने शनीचा दोष दूर होतो आणि वाईट शक्तींच्या प्रभावापासून व्यक्तीचे रक्षण होते. याशिवाय, काही लोक याला भगवान भैरवाचा आशीर्वाद मानतात. भगवान भैरवाला वाईट शक्तींचा नाश करणारा मानले जाते आणि त्यांच्या नावाने काळा धागा धारण केल्याने व्यक्ती सुरक्षित राहते.

पायाभोवती काळा दोरा का बांधला जातो ? पायाभोवती काळा दोरा बांधणे शरीरातील उर्जेचे संतुलन राखण्याशी देखील संबंधित आहे. असे मानले जाते की पायाभोवती तो बांधल्याने नकारात्मक उर्जेचा प्रवेश रोखला जातो. पुरुषांच्या उजव्या पायावर आणि महिलांच्या डाव्या पायावर काळा धागा बांधण्याची परंपरा आहे.

पण सकारात्मक विचार, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास तुम्हाला आयुष्यात पुढे घेऊन जातात. काळा धागा हे फक्त एक प्रतीक आहे जे तुम्हाला आठवण करून देतं की, तुम्ही सुरक्षित आहात आणि जीवनातील प्रत्येक आव्हानाला तोंड देऊ शकता.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)