Multibagger Stock: 20 रुपयांपेक्षा कमी शेअरमध्ये मोठी उसळी, सरकारकडून पहिली मोठी ऑर्डर मिळाली
Share Market: 20 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या या शेअरने तुफान घोडदौड केली. या कंपनीचा शेअर तुफान धावला. सरकारकडून या कंपनीली पहिली मोठी ऑर्डर मिळाल्याने हे तेजीचे सत्र दिसून आले. गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला.

ब्लू क्लाउड सॉफ्टटेक सोल्यूशन्सचा शेअर मंगळवारी 24 मार्च रोजी सुरुवातीच्या व्यापारी सत्रात 6.5 टक्क्यांनी वधारला. या कंपनीला सरकारी कंपनी सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड CEL कडून एक मोठी ऑर्डर मिळाल्यानंतर गुंतवणूकदारांचा उत्साह दिसून आला.

या छोट्या कंपनीतील ही घडामोड गुंतवणूकदारांना दिलासा दिला देऊन गेली. या छोट्या कंपनीचा शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या. या शेअरची किंमत 20 रुपयांपेक्षा कमी आहे. गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी मोठी संधी आहे.

या कंपनीला तेलंगणा सरकारकडून आरोग्यश्री हेल्थकेअर योजनेतंर्गत ऑर्डर मिळाली आहे. या प्रकल्पात सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने कंपनीसोबत करार केला आहे. या प्रकल्पात ब्लू क्लाउड सॉफ्टटेक Access Genie AI प्लॅटफॉर्म लागू करेल. यासह कंपनी विविध रुग्णालयात फील्ड असेसमेंट आणि कस्टमर सर्वे सारख्या सेवा दिल्या.

कंपनीने या प्रकल्पाची किंमत किती याविषयीची माहिती दिली नाही. कंपनीनुसार, व्यावासायिक गोपनियता आणि करारातील अटी व शर्तीमुळे किंमत उघड करण्यात आली नाही. अर्थात SEBI नियमानुसार येत्या काही दिवसात या प्रकल्पाची किंमत समोर येईल.

ब्लू क्लाउड सॉफ्टटेक या शेअरची किंमत 19.16 वर उघडला आणि इंट्राडेमध्ये हा शेअर 19.50 रुपयांच्या उच्चांकावर पोहचला. तर त्याची निच्चांकी कामगिरी 18.90 रुपये आहे. गेल्या एका आठवड्यात हा शेअर जवळपास 2.8 टक्के वधारला. गेल्या तीन महिन्यांचा विचार करता तो 22 टक्क्यांनी घसरला. तर एका वर्षाचा विचार करता हा शेअर 5.6 टक्क्यांनी वाढला.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.