सहा वर्षांपासून ओटीटीवर गाजतेय ही सीरिज; 3 सीझन्स, 33 एपिसोड्स अन् IMDb रेटिंगही तगडी

Web Series: गेल्या सहा वर्षांपासून या वेब सीरिजचे तीनही सिझन्स ओटीटीवर चांगलेच गाजले आहेत. आता प्रेक्षक या सीरिजच्या चौथ्या सिझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. ही सीरिज कोणती, ते जाणून घ्या..

| Updated on: Aug 25, 2026 | 12:50 PM
1 / 5
ओटीटी प्लॅटफॉर्मवर असे अनेक दमदार वेब सीरिज उपलब्ध आहेत, ज्यांनी पहिल्या सिझनशिवाय इतरही सर्व सिझन्सच्या माध्यमातून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. यापैकी काही थ्रिलर सीरिज असे आहेत, ज्यांच्या नव्या सिझनची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. यात सहा वर्षे जुना एक कल्ट क्राइम थ्रिलर वेब सीरिजचाही समावेश आहे.

2 / 5
या वेब सीरिजचे तीन सिझन्स ओटीटीवर खूप गाजले. आता प्रेक्षकांमध्ये चौथ्या सिझनची प्रचंड उत्सुकता आहे. ज्या वेब सीरिजबद्दल आम्ही बोलत आहोत, त्यातून बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या एका मोठ्या सुपरस्टारने कमबॅक केलं होतं. या सीरिजमध्ये अभिनेत्याने नकारात्मक भूमिका साकारली असली तरी, ती त्याच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरली. या सीरिजचं नाव आहे 'आश्रम'.

3 / 5
बॉबी देओलच्या करिअरला कलाटणी देणारी 'आश्रम' ही सीरिज सर्वोत्कृष्ट ओटीटी सीरिजपैकी एक मानली जाते. ही सीरिज 2020 मध्ये एमएक्स प्लेयर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली होती. आज तुम्ही अॅमेझॉन एमएक्स प्लेयर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर या सीरिजचे तीन सिझन्स आणि एकूण 33 एपिसोड्स विनामूल्य पाहू शकता.

4 / 5
प्रकाश झा दिग्दर्शित या वेब सीरिजमध्ये एका तथाकथित धर्मगुरूच्या माध्यमातून सत्ता, पैसा, राजकारण आणि गुन्हेगारीचं जग दाखवण्यात आलं आहे. बाबा निरालाच्या भूमिकेतील बॉबी देओलच्या अभिनयाचं विशेष कौतुक झालं. आता चौथ्या सिझनमध्ये या कथेला पुढे नेण्यात येणार आहे.

5 / 5
आश्रमचा पहिला सिझन ऑगस्ट 2020 मध्ये प्रदर्शित झाला होता. याचे एकूण नऊ एपिसोड्स होते. तर दुसरा सिझन नोव्हेंबर 2020 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. याचेही नऊ एपिसोड्स होते. आश्रमचा तिसरा सिझन दोन भागांमध्ये प्रदर्शित झाला होता. 'सिझन 3'चा भाग 'अ' हा 2022 मध्ये स्ट्रीम झाला. त्याचे एकूण 10 भाग होते. तर तिसऱ्या सिझनचा 'ब' भाग 2025 मध्ये प्रदर्शित झाला. याचे एकूण पाच भाग होते.

Follow Us