
मोहनीश बहल हे बॉलिवूडमधलं एक मोठ नाव आहे. फक्त दर्जेदार चित्रपटच नाही, प्रसिद्ध सीरियल्समध्ये सुद्धा त्याने लोकांच्या लक्षात राहतील अशा भूमिका केल्या आहेत. मोहनीश एक कमाल अभिनेता आहे. मोहनीशने टीव्ही इंडस्ट्रीवर सुद्धा एक छाप उमटवली. त्याची एक वेगळी पर्सनॅलिटी आहे. जी फॅन्सना खूप आवडते.

दिवंगत अभिनेत्री नूतनचा मुलगा असलेल्या मोहनीशने आपल्या शानदार अभिनयाने विलन, संस्कारी मुलग अशा सपोर्टिंग रोल्समधून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. बराच काळ तो आता स्क्रिनपासून लांब आहे.

मोहनीशने वर्ष 1983 साली 'बेकरार' चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष कमाल दाखवू शकला नाही. त्यानंतर 1984 साली आलेल्या 'पुराना मंदिर' सारख्या बी-ग्रेड हॉरर चित्रपटाने मोहनीश बहलला ओळख मिळवून दिली.

खरं यश त्याला 1989 साली सलमान खान आणि भाग्यश्री स्टारर फिल्म 'मैंने प्यार किया' चित्रपटातून मिळालं. या चित्रपटात त्याने विलन जीवनचा रोल साकारलेला. आजही जीवन प्रेक्षकांच्या लक्षात आले.

मोहनीश याने 1994 साली आलेल्या 'हम आपके हैं कौन' आणि 1999 सालच्या 'हम साथ-साथ हैं' या चित्रपटात संस्कारी मोठा भाऊ विवेक आणि राजेशचा रोल साकारलेला. त्याने या भूमिका साकारुन प्रेक्षकांच्या मनात एक स्थान निर्माण केला.

दीर्घकाळ मोहनीश चित्रपटांपासून लांब आहे. वर्ष 2019 साली 'पानीपत' चित्रपटात तो शेवटचा दिसलेला. सध्या तो आपल्या कुटुंबासोबत शांततेत आयुष्य जगत आहे. चांगल्या रोल्सची वाट पाहतोय.