
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर रिया चक्रवर्ती हे नाव चांगलेच चर्चेत आले. रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंह हे रिलेशनमध्ये होते. सुशांत सिंह याच्याच घरी रिया चक्रवर्ती ही राहत.

सुशांतच्या निधनानंतर रिया चक्रवर्ती हिच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. हेच नाही तर जेलमध्ये काही दिवस राहण्याचीही वेळ रिया चक्रवर्तीवर आली.

रिया चक्रवर्ती हिच्याबद्दल आमिर खानने मोठा खुलासा केलाय. आमिर खान म्हणाला की, रिया चक्रवर्तीने लाल सिंह चड्ढा चित्रपटासाठी ऑडिशन दिले होते.

विशेष म्हणजे तिचे हे ऑडिशन अत्यंत चांगले गेले होते. मी तिला मेसेज करून सांगितले की, तुझे ऑडिशन खूप छान गेले पण मी तुला नाही घेऊ शकत.

लाल सिंह चड्ढा चित्रपटात करीना कपूर ही मुख्य भूमिकेत दिसली. मात्र, आमिर खान याचा हा चित्रपट फ्लॉप गेला. या चित्रपटाला धमाका करण्यात अजिबातच यश मिळाले नाही.