
बॉलिवूड सेलेब्स जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यांचे चित्रपट आणि शैली सर्वत्र फॉलो केली जाते. प्रत्येक कलाकाराची स्वतःची वेगळी ओळख असते. बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणेच त्यांचे ‘लूक-अ-लाईक’ देखील तितकेच प्रसिद्ध आहेत. त्याची फॅन फॉलोइंगही कोणत्याही बड्या स्टारपेक्षा कमी नाही. आज आम्ही आपल्याला अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) याच्या लूक-अ-लाईकबद्दल सांगत आहोत, ज्याने त्याच्या जबरदस्त लूकने सर्वांचे मन जिंकले आहे.

जॉन अब्राहमप्रमाणे दिसणाऱ्या या व्यक्तीचे नाव मुबशीर मलिक (Mubashir malik) आहे. तो ब्रिटीश ब्रॉडकास्टर असण्यासोबतच लेखिक देखील आहे. मुबशीर सोशल मीडियावर खूप अॅक्टिव आहे आणि बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम यालाही भेटला आहे. त्याने जॉनसोबतचा एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे.

जॉन प्रमाणेच त्याच्या लूक-अ-लाईकलाही ‘डिम्पल’ आहेत. मुबशीरने बॉलिवूडच्या अनेक स्टार्सची भेट घेतली आहे. त्याने ट्विटरवर अनेक सेलिब्रिटींसोबत फोटो शेअर केले आहेत. मुबशीरने दीपिका पदुकोणचीही भेट घेतली होती. पठाण या चित्रपटात जॉन आणि दीपिका लवकरच शाहरुख खानसोबत दिसणार आहेत.

मुबशीरने दीपिका व्यतिरिक्त करीना कपूर आणि सैफ अली खान यांनाही भेटला आहे. एका पार्टीदरम्यान तो या दोघांना भेटला होता.

मुबशीर सोशल मीडियावर अनेक विषयांवर आपली बेधडक मत देण्यास मागेपुढे पाहत नाही.