
अभिनेत्री वर्षा उसगांवकर या बिग बॉसच्या घरात धमाका करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे सर्वात चर्चेत असलेले नाव म्हणजे वर्षा उसगांवकर आहे.

नुकताच भाऊच्या धक्क्यामध्ये असे काही घडले की, रितेश देशमुखही स्वत:ला रोखू शकला नाही. टास्कवेळी जान्हवीने वर्षा उसगांवकर यांना बोलावले.

यावेळी जान्हवी आणि वर्षा उसगांवकर या मला जाऊद्याना घरी आता वाजले की बारा या गाण्यावर धमाकेदार डान्स करताना दिसल्या.

वर्षा उसगांवकर यांचा डान्स पाहून रितेश देशमुखही स्वत:ला शिट्टी वाजवण्यापासून रोखू शकला नाही. धमाकेदार डान्स वर्षा उसगांवकर यांनी केला.

वर्षा उसगांवकर यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे आता बिग बॉसमध्ये दाखल झाल्यापासून वर्षा उसगांवकर चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.