
टीकू तल्सानिया यांनी त्यांच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका या केल्या आहेत. टीकू तल्सानिया यांची सोशल मीडियावर जोरदार फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मात्र, नुकताच आता टीकू तल्सानिया यांनी मोठा खुलासा केलाय.

टीकू तल्सानिया यांनी त्यांच्या करिअरमध्ये आतापर्यंत 200 पेक्षाही अधिक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. मात्र, असे असतानाही टीकू तल्सानिया यांना काम मिळत नाहीये. ते सध्या कामाच्या शोधात आहे.

टीकू तल्सानिया यांनीच याबद्दल खुलासा केला. टीकू तल्सानिया म्हणाले की, मी गेल्या काही दिवसांपासून कामाच्या शोधात आहे. परंतू मला काम मिळत नाहीये. मी बरेच ठिकाणी ऑडीशन देखील दिले. मात्र, कामच मिळत नाहीये.

मला पुढेही काम करण्याची खूप जास्त इच्छा आहे. परंतू हवे तसे काम मिळत नाहीये. टीकू तल्सानिया यांचे हे भाष्य ऐकून सर्वचजण हैराण झाल्याचे बघायला मिळतंय.

टीकू तल्सानिया हे सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना टीकू तल्सानिया हे दिसले आहेत.