नाना पाटेकर ते अच्युत पोतदार…, फक्त सिनेमांमध्ये नाही तर, सैन्यात देखील ‘या’ अभिनेत्यांनी बजावली महत्त्वाची भूमिका

बॉलिवूडमधील अनेक सिनेमे हे देशभक्तीवर आधारित आहेत. ज्यामध्ये अनेक अभिनेत्यांना भारतीय सेनेतील अधिकाऱ्यांची भूमिका बजावली आहे. फिल्मी विश्वात असे सेलिब्रिटी देखील आहे, ज्यांनी फक्त सिनेमांमध्ये नाही तर सैन्यात देखील महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

| Updated on: May 10, 2025 | 3:43 PM
1 / 6
22 एप्रिल ही अशी तारीख आहे की या दिवसाने संपूर्ण भारताला हादरवलं. या दिवशी काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला, ज्यामध्ये 26  निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले. यानंतर, भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले.

2 / 6
दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांनी 1978 मध्ये  करीयरला सुरुवात केली.  यानंतर, 1999 मध्ये, कारगिल युद्धादरम्यान त्यांची भारतीय सैन्यात कॅप्टन पदासाठी निवड झाली.

3 / 6
 बिक्रमजीत कंवरपाल यांनी अनेक सिनेमा आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. पण, अभिनय करण्यापूर्वी, ते 1989 मध्ये भारतीय सैन्यात सामील झाले आणि 2002 मध्ये मेजर पदासाठी त्यांची निवड झाली. पण कोविड महामारीच्या काळात त्यांनी जगाचा निरोप घेतला.

4 / 6
 अच्युत पोतदार हे आमिर खानच्या 3 इडियट्स सिनेमासाठी ओळखले जातात. पण फार कमी लोकांना माहिती आहे की त्यांनी भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून काम करून देशाची सेवा केली. सुरुवातीला त्यांनी प्राध्यापक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.

5 / 6
 'महाभारत' मध्ये 'शकुनी मामा' ही भूमिका साकारणारे गुफी पेंटल यांनी 1962 मध्ये भारत - चीनमध्ये झालेल्या युद्धात देशाची सेवा केली होती. कॉलेजमध्ये असताना ते भारतीय सेनेत दाखल झाले होते.

6 / 6
 अभिनेते रहमान यांनी देखील देशाची सेवा केली आहे. त्यांनी सिनेमांद्वारे लोकांच्या मनावर राज्य केलं. पण, ते भारतीय हवाई दलात पायलट होते. पण, सिनेमांमध्ये काम करण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली.