
ऐश्वर्या राय फक्त प्रसिद्ध अभिनेत्री नसून बच्चन कुटुंबाची सून देखील आहे. १९९४ मघध्ये मिस वर्ल्ड किताब जिंकल्यानंतर ऐश्वर्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही.

एक काळ असा होता, जेव्हा सर्वत्र ऐश्वर्या राय हिच्या सिनेमांच्या चर्चा रंगलेल्या असतात. आता अभिनेत्री पूर्वीप्रमाणे सिनेमात दिसत देखील नाही. पण ऐश्वर्या रॉयल आयुष्य जगत असते.

मीडिया रिपोर्टनुसार ऐश्वर्या हिच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. अभिनेत्रीकडे मुंबईतील वांद्र याठिकाणी अपार्टमेंट आहे. ऐश्वर्याच्या घराची किंमत २१ कोटी रुपये आहे.

फक्त मुंबई नाही तर दुबई याठिकाणी देखील ऐश्वर्याचं भव्य घर आहे. आभिनेत्रीच्या परदेशातील घाराची किंमत १५.६ कोटी रुपये आहे. ऐश्वर्या हिच्याकडे २.५ कोटी रुपयांची मर्सडीज देखील आहे. शिवाय बच्चन कुटुंबियांकडे देखील अनेक महागड्या गाड्या आहेत.

ऐश्वर्याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, नुकताच अभिनेत्री Ponniyin Selvan 2 सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली होती. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील तगडी कमाई केली. याआधी देखील अनेक सिनेमांच्या माध्यमातून अभिनेत्रीने चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे.