
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिचे चित्रपट कायमच धमाका करताना दिसतात. विशेष म्हणजे आलियाचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत.

नुकताच आता आलिया भट्ट हिच्याकडून मोठा खुलासा करण्यात आलाय. पहिल्यांदाच आपल्या आरोग्याबद्दल बोलताना आता आलिया भट्ट ही दिसली आहे.

आलिया भट्ट म्हणाली की, ADD नावाचा आजार मला आहे. ADD म्हणजे अटेंशन डेफिसिट डिसऑर्डर. म्हणजेच बऱ्याच गोष्टींमध्ये तिला काही वेळानंतर अजिबातच रस राहत नाही.

आलिया म्हणाली की, ती 45 मिनिटांपेक्षा अधिक काळ मेकअप चेअरवर बसू शकत नाही. मला वाटते की, जे काही होत आहे ते फास्ट व्हायला पाहिजे बाकी काही नाही.

आलिया म्हणाली, मला मेकअपवालांनी माझ्या लग्नात सांगितले होते की, दोन तास मेकअपसाठी लागतील. पण मी स्पष्ट शब्दांमध्ये त्यांना सांगितले की, हे अजिबातच शक्य नाही.