
बॉलिवुड जगतात मोठं नाव असलेली अभिनेत्री अमिषा पटेल नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. आपल्या 25 वर्षांच्या करिअरमध्ये तिने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले.

मात्र वयाचे 50 वर्षे झाले असले तरी ती अजूनही सिंगलच आहे. तिने अद्याप लग्न केलेले नाही. आता मात्र तिने लग्न न करण्याचं मोठं कारण सांगितलं आहे.

फिल्मी मंत्रला दिलेल्या मुलाखतीत अमिषा पटेलने लग्न न करण्यामागचं कारण सांगितलं आहे. मी माझ्या आयुष्यात खूप खूश आहे. मला वाटतं की मला जोडीदाराची गरज नाही. मी माझ्या कामात फारच व्यग्र असते. त्यामुळे मला या सर्व गोष्टीसाठी वेळ नाही, असं अमिषाने स्पष्ट केलंय.

तसेच, मला आवडेल असा एखादा मुलगा अजून सापडलेला नाही. मी जशी आहे तशी खूश आहे. मी फार बिझी असते, माझं दिनक्रमही अनियमित असत, माझे कामाचे तास जास्त असतात. त्यामुळे मी या नात्याला न्याय देऊ शकेल, असं मला वाटत नाही, असेही अमिषा पटेलने स्पष्ट केले.

दरम्यान, अमिषा पटेलचे नाव अनेक अभिनेत्यांसोबत याआधी जोडले गेलेले आहे. तिने गिद्गर्शक विक्रम भट्ट यांना पाच वर्षे डेट केलं होतं.

सोबतच तिचे नाव कनव पुरी, कुणाल गूमर, निर्वाण पटेल यांच्यासोबतही जोडण्यात आले होते.