
चंकी पांडेची लेक आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. अनन्या पांडे हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत.

अनन्या पांडे हिने वयाच्या 18 व्या वर्षीच बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. मात्र, तिला काही गोष्टींसाठी ट्रोल केले गेले. यानतंर तिने आपल्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष दिले.

आता अनन्या पांडे हिने नुकताच हिप सर्जरी केली आहे. अनन्या पांडेने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोंनंतर दावा केला जातोय की, अनन्या पांडे हिने हिप सर्जरी केलीये.

आता हिप सर्जरी केल्याने अनन्या पांडे ही सोशल मीडियावर तूफान ट्रोल होताना दिसत आहे. लोक हे अनन्या पांडे हिला खडेबोल सुनावताना दिसत आहेत.

अनन्या पांडे हिच्याकडून हिप सर्जरीबद्दल खुलासा करण्यात आला नाहीये. मात्र, एक चर्चा आहे की, अनन्या पांडे हिने हिप सर्जरी केली आहे.