पहिलीच मुलाखत अन् अनुष्का शर्माची ती गोष्ट पाहून नर्वस झालेला विराट, नेमकं काय घडलं?

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माची ती गोष्ट पाहून हैराण झालेला विराट कोहली. पहिल्याच मुलाखतीत का नाराश झालेला विराट? समोर आलं कारण

| Updated on: May 01, 2026 | 6:03 PM
1 / 5
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने 1 मे रोजी आपला 38वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनुष्का सध्या चित्रपटांमध्ये कमी दिसत असली तरी ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते.

2 / 5
तिच्या वाढदिवसानिमित्त तिची आणि विराट कोहलीची गोड लव्हस्टोरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांची पहिली भेट 2013 साली एका जाहिरातीच्या शूटदरम्यान झाली होती. विराटने एका मुलाखतीत या भेटीचा एक मजेशीर किस्सा सांगितला होता.

3 / 5
विराटच्या मते, 'माझ्या मॅनेजरने मला सांगितले की मला अनुष्का शर्मासोबत अॅड शूट करायचं आहे, तेव्हा मी खूपच नर्व्हस झालो होतो.' पहिल्यांदा भेटल्यावर विराटला अनुष्काची उंची किती आहे याचा अंदाज येत नव्हता. त्याने तिच्या हिल्सवर टिप्पणी करत विचारले, 'तुम्हाला यापेक्षा उंच काही घालायला मिळालं नाही का?' यावर अनुष्काने थोड्या आश्चर्याने Excuse me? असा प्रतिसाद दिला.

4 / 5
हा प्रसंग थोडासा अवघडलेला असला तरी पुढे दोघांमध्ये चांगली मैत्री निर्माण झाली. पहिल्या भेटीनंतर दोघेही चांगले मित्र झाले आणि हळूहळू ही मैत्री प्रेमात बदलली. काही काळ डेट केल्यानंतर त्यांनी आपल्या नात्याला अधिकृत रूप दिले.

5 / 5
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी 2017 साली इटलीमध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नाची चर्चा देशभरात झाली होती. पुढे 2021 साली त्यांना कन्या वामिका झाली, तर 2024 साली त्यांनी मुलगा अकायचे स्वागत केले.

Follow Us