
अनुष्का शर्मा आणि रणबीर कपूर हे दोघे खूप चांगले मित्र आहे. मात्र, एकदा चित्रपटाच्या सेटवर अनुष्का शर्मा हिने चक्क तीन वेळा रणबीर कपूर याच्या कानाखाली जाळ काढला होता.

याबद्दल अनुष्का शर्मा हिने एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे. ऐ दिल है मुश्किल चित्रपटाच्या सेटवरच अनुष्का शर्मा हिने रणबीर कपूर याच्या कानाखाली तीन वेळा जाळ काढला.

एका सीनवेळी अनुष्का शर्मा हिने तीनवेळा रणबीर कपूर याच्या कानाखाली लावली. मात्र, यानंतर रणबीर कपूर हा चांगलाच भडकला आणि थेट म्हणाला की, हा मजाक सुरू नाहीये.

यानंतर अनुष्का शर्मा हिच्या लक्षात आले की, रणबीर कपूर हा चिडला आहे. त्यानंतर अनुष्का शर्मा हिने थेट रणबीर कपूर याची माफी मागितली होती.

अनुष्का शर्मा हिने शेवटी झिरो या चित्रपटामध्ये काम केले होते. मात्र, हा चित्रपट फ्लाॅप गेला. अनुष्का शर्मा हिचे चाहते तिच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत.