
भाग्यश्री म्हटली की, डोळ्यासमोर 'मेने प्यार किया' चित्रपट. सलमान खान आणि भाग्यश्रीचा गाजलेला हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या चांगला लक्षात आहे.

दरवर्षी 15 मार्चला वर्ल्ड स्लीप डे साजरा केला जातो. रात्रीची झोप पूर्ण झाली नाही, तर दुसऱ्या दिवसाची वाट लागू शकते. झोपेप्रती लोकांना जागरुक करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. रात्री झोपण्याधी कुठली आसन केली पाहिजेत. ते भाग्यश्रीकडून जाणून घ्या.

बॉडी रिलॅक्स असेल, तर चांगली झोप येते. अभिनेत्री भाग्यश्री फिटनेस फ्रीक आहे. अनेकदा ती व्हिडिओ शेअर करुन फिटनेस टीप देते. झोपण्याआधी बेडवर कुठल आसन केलं पाहिजे? ते भाग्यश्रीने सांगितलय.

तणाव हे झोप न येण्यामागच एक कारण आहे. तुम्ही नियमित बालासन करत असाल, तर मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होतो. भाग्यश्रीप्रमाणे तुम्ही सुद्धा झोपण्याआधी बेडवर हे आसन करु शकता.

पोट खराब असेल, तर शरीर आणि मानसिक आरोग्य दोघांवर परिणाम होतो. वज्रासन केल्यास चांगलं पचन होतं. म्हणून हे आसन रोज करा.