
बाॅलिवूड अभिनेत्री काजोल ही नेहमीच चर्चेत असते. काजोल आणि अजय देवगण यांची मुलगी निसा देवगण ही गेल्या काही दिवसांपासून नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. सतत निसा हिच्यावर टिका ही सोशल मीडियावर केली जात आहे.

नुकताच काजोल हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्या चाहत्यांना अत्यंत मोठा धक्का दिला आहे. इतकेच नाही तर काजोल हिने तिच्या सोशल मीडियावरील सर्व पोस्ट या डिलीट केल्या आहेत.

या पोस्ट डिलीट करत काजोल हिने मोठी घोषणा करत थेट सोशल मीडियावरून ब्रेक घेत असल्याचे जाहिर केले. इतकेच नाही तर काजोल हिने एक पोस्ट शेअर करत धक्कादायक खुलासा देखील केला आहे, ज्यामुळे चाहते हैराण झाले.

काजोल हिने पोस्टमध्ये म्हटले की, मी आयुष्यामध्ये सध्या सर्वात वाईट काळामधून जात आहे. यामुळे मी आता काही दिवस सोशल मीडियावरून ब्रेक घेत आहे. काजोल हिने हा निर्णय नेमका का घेतला, यावर चर्चा रंगताना दिसत आहे.

निसा देवगण हिला सतत सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. यामुळेच काजोल हिने सोशल मीडियाला रामराम केल्याची एक चर्चा आहे. यामुळेच काजोल हिने थेट सर्वात वाईट काळातून जात असल्याचे देखील म्हटले आहे.