
बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या चित्रपटांमुळे तूफान चर्चेत आहे. विशेष म्हणजे एका मागून एक असे चित्रपट शाहरुख खान याचे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

जवान चित्रपटाचे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रमोशन करताना सध्या शाहरुख खान हा दिसत आहे. विशेष म्हणजे सतत आपल्या चाहत्यांना या चित्रपटाबद्दलचे अपडेट शाहरुख खान हा देतोय.

गेल्या काही दिवसांपासून एक चर्चा तूफान रंगताना दिसत आहे की, शाहरुख खान याच्या जवान चित्रपटामध्ये कियारा अडवाणी हिचा कॅमिओ असणार आहे. यामुळे कियाराचे चाहतेही आनंदी बघायला मिळाले.

नुकताच आलेल्या रिपोर्टनुसार जवान चित्रपटामध्ये कियारा अडवाणी हिचा कॅमिओ होणार नाहीये. यामुळे आता कियाराचे चाहते निराश झाल्याचे बघायला मिळत आहेत.

शाहरुख खान याच्या या अगोदरच्या पठाण चित्रपटामध्ये सलमान खान याचा कॅमिओ बघायला मिळाला होता. शाहरुख खान आणि सलमान खान याची जोडी धमाका करताना दिसली होती.