
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांनी 90 च्या दशकात अनेक हिट चित्रपटांमध्ये धमाकेदार भूमिका केल्या आहेत. विशेष म्हणजे यांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडली.

माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांच्या अफेअरच्या चर्चा देखील जोरदार रंगल्या. मात्र, यांनी कधीच त्यावर भाष्य केले नाही. हेच नाहीतर माधुरी दीक्षित हिने एका मुलाखतीमध्ये थेट म्हटले होते की, अनिल कपूरसारखा पती नको.

एका मुलाखतीमध्ये माधुरी दीक्षित हिला विचारण्यात आले की, अनिल कपूरसारखा पती हवा आहे का? यावर स्पष्टपणे नकार देत माधुरी दीक्षित म्हणाली की, मला शांत स्वभावाचा पती हवा आहे.

अनिल कपूर खूप जास्त रागिट व्यक्ती आहे, त्यामुळे त्यांच्यासारखा व्यक्ती मला पती नको. एकदा सेटवर अनिल कपूरची पत्नी कुटुंबाला घेऊन पोहोचली होती.

त्यावेळी अनिल कपूर हे शूटिंगमध्ये बिझी होते आणि त्यानंतर कुटुंबियांसोबत खास वेळ घालवताना अनिल कपूर दिसली. त्यानंतर अनिल कपूरपासून दूर माधुरी गेल्याचे सांगितले जाते.