वयाच्या 53 व्या वर्षी मलायकाचं फिटेनेस पाहून उंचावल्या सर्वांच्याच भुवया, फोटो पाहून म्हणाल…

अभिनेत्री मलायका अरोरा आता तिच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे नाही तर, फिटेनेस आणि क्लासी लूकमुळे चर्चेत असते. आता देखील मलायका हिचे काही फोटो व्हायरल होत आहेत, सर्वत्र तिच्या फिटनेसची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Nov 21, 2026 | 3:54 PM
1 / 5
अभिनेत्री मलायका अरोरा हिला आज कोणत्यात ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये आयमट सॉन्ग करत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आजही चाहत्यांमध्ये मलायका हिची क्रेझ पाहायला मिळते.

अभिनेत्री मलायका अरोरा हिला आज कोणत्यात ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये आयमट सॉन्ग करत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आजही चाहत्यांमध्ये मलायका हिची क्रेझ पाहायला मिळते.

2 / 5

एवढंच नाही तर, तिच्या बोल्डनेसवर देखील असंख्य चाहते फिदा आहेत. मलायका चाहत्यांना फक्त फॅशन टिप्स नाही तर, फिटनेस टिप्स देखील देत असते. मलायका 53 वर्षांची आहे. पण दिवसागणिक अभिनेत्रीचा बोल्डनेस वाढतच आहे...

3 / 5

लाल रंगाच्या ड्रेसमध्ये फोटो पोस्ट करत मलायका हिने तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. तिच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

4 / 5

अभिनेत्री कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेत्री मलायका अरोरा कायम सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

5 / 5

अभिनेत्री तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. अभिनेता अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायका हिने अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करण्यास सुरुवात केली. पण दोघांचं नातं देखील फार काळ टिकलं नाही. आता तिचं नाव एका हिरे व्यापाऱ्यासोबत जोडलं जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us