
बॉलिवूडची अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. तिचे सोशल मीडियावर जीम आऊटफीटमधील, पार्टीवेअर ड्रेसमधील अनेक फोटो नेहमीच व्हायरल होत असतात.

विशेष म्हणजे इन्स्टाग्रामवर कोट्यवधी फॅन्स असणारी मलायका अरोरा तिच्या आयुष्यात नेमकं काय चाललंय, हे आपल्या चाहत्यांना व्हिडीओ आणि फोटोंच्या माध्यमातून माहिती देत असते.

मलायकाने नुकतेच इन्साटाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिचं सौंदर्य चांगलंच खुललं आहे. विशेष म्हणजे ती लाल रंगाच्या बॅकलेस ड्रेसमध्ये फारच सुंदर दिसत आहे.

मलायकाने एका रेस्टॉरमंटमध्ये बसलेली असतानाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्या हातात रेड वाईनचा एक ग्लास दिसतोय. याच फोटोमध्ये तिच्या पोटाजवळ एक खास टॅटू आहे. हा टॅटू पूर्णपणे दिसत नसला तरी तो नेमका काय आहे? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. एका हॉटेलच्या बाहेर उभा राहिलेलादेखील फोटो तिने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

मलायकाने आतापर्यंत अनेक रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून भाग घेतलेला आहे. विशेष म्हणजे अनेक चित्रपटांत तिने गाण्यांत केलेल्या डान्सची आजही तेवढीच चर्चा होते.

काही दिवसांपूर्वी ती अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनमध्ये होती. आता मात्र ती कोणालाही डेट करत नसल्याचे म्हटले जात आहे. (सर्व फोटो- इन्स्टाग्राम)