
अभिनेत्री मनिषा कोईराला सध्या तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. वयाच्या 55 व्या वर्षी देखील मनिषा प्रचंड फिट आहे. दिवसागणिक मनिषा कोईरालाचा बोल्डनेस वाढतोय.

अभिनेत्री मनिषा कोईराला आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. चाहत्यांना अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे.

वयाच्या 55 व्या वर्षी अभिनेत्रीने क्लासी फोटो पोस्ट केले आहेत. अभिनेत्रीच्या फोटोंवर अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहे. 'आपकी तारीफ में क्या कहें...' अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. सध्या सर्वत्र फोटोंची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री मनिषा कोईराला स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री अभिनयापासून दूर होती. पण 'हीरामंडी' मुळे चर्चेत होती. आता देखील चाहते 'हीरामंडी' सीरिजच्या दुसऱ्या भागाच्या प्रतिक्षेत आहेत.

मनिषा हिच्या चाहत्यांची संख्या आजही फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. इन्स्टाग्रामवर 2.3 मिलियन नेटकरी फॉलो करतात तर, अभिनेत्री फक्त 2,182 नेटकऱ्यांना फॉलो करते.