
बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय आज आपला 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी अभिनेत्री आता थेट मालदीवला पोहोचलीये.

मौनी रॉय हिने मालदीवमधील काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती अत्यंत बोल्ड आणि जबरदस्त दिसतंय.

मौनी रॉय हिचा हा लूक तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडलाय. लाल रंगाच्या बिकिनीमध्ये अभिनेत्रीने हे फोटोशूट केले आहे. समुद्राच्या जवळ हे फोटोशूट तिने केले.

मौनी रॉय हिने शेअर केलेले हे फोटो तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडताना दिसत आहेत. चाहते तिच्या या फोटोंवर मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.

सकाळपासूनच मौनी रॉय हिला चाहत्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. मौनी रॉय हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये हीट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.