
बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेहीला नृत्याची राणी म्हटले जाते. अनेकदा तिच्या नोरा डान्ससाठी की डान्स नोरासाठी हे सांगणे खरोखर कठीण आहे. पण परफॉर्मर बनणे नोरासाठी इतके सोपे नव्हते.

बॉलिवूडमधीलसुंदर सेलिब्रिटीबद्दल चर्चा करताना आपसूकच नोरा फतेहीचे नाव टॉपमध्ये येते. आपल्या सौंदर्य आणि स्टाईलमुळे ही नोरा नेहमीच चर्चेत राहते. नोरा फतेहीमधील अद्भुत प्रतिभा म्हणजे नृत्य होय.

नोराला असलेले नृत्याचे वेड कुणापासून लपलेले नाही. नृत्यामुळे ऊर्जा मिळते. आणि म्हणूनच ती नृत्याची एकही संधी हातातून जाऊ देत नाही. मात्र या नृत्याच्या आवडीमुळे नोराला मार ही खावा लागला आहे.

नोरा फतेहीच्या घरी डान्स करण्यास मनाई होती. तिच्या आई-वडिलांना नृत्य करणे अजिबात आवडत नव्हते. त्यामुळे त्याने नोराला डान्स करण्यास स्पष्ट नकार दिला होता. पण नोराला डान्सवर अमर्याद प्रेम होतं. त्यामुळे ती गुपचूप नाचायची.

अनेकदा नोरा तिच्या आई आणि वडिलांपासून लपून खोलीत डान्स करायची. पण जेव्हा जेव्हा तिची आई तिला डान्स करताना पाहायची तेव्हा तिला रागवयाची प्रसंगी मारही दिली. मात्र नोराने आपल्या नृत्याचा छंद सोडला नाही.