
अभिनेत्री रवीना टंडन हिने साध्या लूकमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडलेला आहे.

अभिनेत्री रवीना टंडन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

वयाच्या 49 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. कोणत्याही लूकमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर आणि ग्लॅमरस दिसते.

वयाच्या 49 व्या वर्षी देखील रवीना चाहत्यांना फॅशन गोल्स देताना दिसते. वेस्टर्न आणि पारंपरिक ड्रेसमध्ये रवीना हिचं सौंदर्य कायम फुलून दिसतं.

आज रवीना मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, चाहत्यांमध्ये अभिनेत्रीची क्रेझ आजही कायम आहे. रवीनाच्या चाहत्यांची संख्या आजही मोठी आहे.