
अभिनेत्री सारा अली खान हिने सावत्र आई करीना कपूर हिच्या व्हॉट वीमेन वॉन्ट या शोमध्ये हजेरी लावली होती. शोमध्ये साराने तिच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी सांगितल्या.

शोमध्ये करीनाने साराला ‘वन नाईट स्टँड’बद्दल विचारलं. तू एका मॉर्डन कुटुंबातील मुलगी आहेस, तर वन नाईट स्टँड’बद्दल तुला काय म्हणायचं आहे? यावर साराने उत्तर दिल्यानंतर करीना देखील थक्क झाली.

करीना हिच्या प्रश्नाचं उत्तर देत अभिनेत्री म्हणाली, ‘वन नाईट स्टँड असं कधीही झालं नाही…’, सावत्र मुलीचं उत्तर ऐकल्यानंतर करीना हिने देखील मोकळा श्वास घेतला.

महत्त्वाचं म्हणजे साराचं नाव आजपर्यंत अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. अभिनेता कार्तिक आर्यन आणि क्रिकेटपटू शुबमन गिल याच्यासोबत देखील सारा नाव जोडण्यात आलं.

सारा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सारा सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.