
स्वरा भास्कर हिने समाजवादी पक्षाचा नेता फहाद अहमद याच्यासोबत लग्न केल्याचे जाहिर करत सर्वांनाच मोठा धक्का दिला होता. अगोदर स्वरा भास्कर हिने फहाद अहमद यांच्यासोबत कोर्टात लग्न केले.

6 जानेवारीलाच स्वरा हिने फहाद अहमद याच्यासोबत लग्न केले होते. मात्र, ही गोष्ट काही दिवस स्वरा भास्कर हिने सर्वांपासून लपवून ठेवली होती. 6 जानेवारी रोजी स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत लग्नाची नोंदणी त्यांनी केली.

आता नुकताच स्वरा भास्कर हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रेग्नेंट असल्याचे जाहिर केले आहे. आॅक्टोबर महिन्यात स्वरा बाळाला जन्म देणार आहे. काही खास फोटोही शेअर करण्यात आले आहेत.

पिंक रंगाच्या ड्रेसमध्ये स्वरा भास्कर हिने हे फोटोशूट केले असून या फोटोमध्ये तिचा पती फहाद अहमद हा देखील दिसत आहे. आता स्वरा भास्कर हिची ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

फहाद अहमद याच्यासोबत लग्न केल्यानंतर स्वरा भास्कर ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली होती. अनेकांनी स्वरा भास्कर हिला टार्गेट करत अनेक पोस्ट शेअर केल्या होत्या.