
बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. ‘फिर आई हसीन दिलरुबा’चे खास स्क्रिनिंग नुकताच ठेवण्यात आले होते. यावेळी तापसी पन्नू ही पोहोचली होती.

तापसी पन्नू हिचे यादरम्यानचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. यावेळी तापसी पन्नू ही चांगलीच भडकल्याचे बघायला मिळतंय.

तापसी पन्नू ही पापाराझी यांना थेट म्हणते की, चढू नकोस... जास्त जवळ येऊ नका...मला तुम्ही घाबरवत आहात...यानंतर एक पापाराझी हा तापसी पन्नूला सॉरी म्हणताना देखील दिसतोय.

यावेळी तापसी पन्नू ही रागामध्ये गाडीत बसताना दिसत आहे. पापाराझी सॉरी बोलत असताना देखील काहीच रिप्लाय न देता तापसी पन्नू ही निघून जाताना दिसत आहे.

आता तापसी पन्नू हिचे हेच काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. लोकांना तापसी पन्नू हिचे हे वागणे आवडले नसल्याचे बघायला मिळतंय.