Photo Gallery | ‘बंबई नजरिया’ तृतीयपंथींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणारा कॅफे

| Updated on: Apr 09, 2022 | 6:49 PM

या कॅफेत तृतीयपंथी व्यक्तींना नोकरी देत, ट्रान्सजेंडर समुदायाची रूढीवादी प्रतिमा मोडीत काढणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. 'नझरिया बदलो, नजर बदलेगी' (तुमचा दृष्टिकोन बदला आणि जग बदलेल) हे कॅफेचे ब्रीदवाक्य आहे.

1 / 7
मुंबईची सफर करताना मुंबईतील खाद्य संस्कृतीचा आस्वाद आपण अनेकदा  घेतला आहे.  यामध्ये  अगदी पंचतारांकित  हॉटेल्सपासून  स्ट्रीट फूडचा  समावेश आहे. याच प्रकारे तृतीयपंथी समुदायाला समाजाच्या  मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत असलेल्या 'बंबई नजरिया' कॅफेमधील  पदार्थांचा आस्वाद कधी घेतला आहे का?

2 / 7

मुंबईतील वर्सोवा, अंधेरी पश्चिम  या भागात   असलेलं हे  कॅफे समाजात तृतीयपंथींबदल असलेला दृष्टीकोन बदलण्यासाठी काम करते. 'कुणालाही मागे  ठेवू नका'  धारणेवर काम करत आहे.

3 / 7
कॅफेचे संस्थापक मिरांडा यांच्या म्हणण्यानुसार 'बंबई नजरिया'  त्याच्या व्हिजनवर काम करण्यासाठी सात वर्षे लागली. परंतु समाजात  आवश्यक असलेला बदल घडवून आणण्यासाठी त्याने एक पाऊल उचलले याचा आनंद आहे.  हा बदल त्यानां खूप काळापासून अपेक्षित होता.

4 / 7
या कॅफेमध्ये कामासाठी केवळ तृतीयपंथी लोकांनाच  कामावर ठेवले जाते. हा कॅफे सर्व लोकांसाठी खुला आहे. येथे खाण्यासाठी, आनंदात वेळ घालवण्यासाठी अत्यंत चांगले ठिकाण आहे.

5 / 7
या कॅफेत तृतीयपंथी व्यक्तींना  नोकरी देत, ट्रान्सजेंडर समुदायाची रूढीवादी प्रतिमा मोडीत काढणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. 'नझरिया बदलो, नजर बदलेगी' (तुमचा दृष्टिकोन बदला आणि जग बदलेल) हे कॅफेचे ब्रीदवाक्य आहे.

या कॅफेत तृतीयपंथी व्यक्तींना नोकरी देत, ट्रान्सजेंडर समुदायाची रूढीवादी प्रतिमा मोडीत काढणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. 'नझरिया बदलो, नजर बदलेगी' (तुमचा दृष्टिकोन बदला आणि जग बदलेल) हे कॅफेचे ब्रीदवाक्य आहे.

6 / 7
बंबई नजरियाच्या कर्मचाऱ्यांना स्वतःला 'होस्ट' म्हणवून घेणे आणि 'मेहमान नवाजी' (आतिथ्य) या संकल्पनेचे पालन करणे, त्यांच्या ग्राहकांना चांगले जेवण देणे आणि ते आरामात जेवणाचा आस्वाद घेतील याची  खात्री करणे अधिक पसंत करतात.

7 / 7
मुंबईच्या खास पावभाजी, कीमा पाव आणि मिसळ पावापासून ट्रेंडिंग काश्मिरी गुलाबी चहापर्यंत हा  कॅफे पाहुण्यांना विविध प्रकारचे खाद्यपदार्थ पुरवतो.