27 वर्ष जुनं गाणं, सुपरहिट होताच पूर्ण केलं वचन; भारतात प्रथमच आलेली BMW कार दिली भेट, ते गाणं आजही…

बॉलिवूडमध्ये चित्रपटांतील कलाकारांची नेहमीच चर्चा असते. या चित्रपटांतील काही गाणी अनेक वर्षांपर्यंत चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. या गाण्यांइतक्याच त्यांच्या निर्मितीदरम्यान घडलेल्या रंजक गोष्टीही चर्चेत असतात. असाच एक जुना किस्सा सध्या समोर आला आहे. प्रसिद्ध निर्माता बोनी कपूर यांनी सांगितलेल्या या आठवणीमुळे चित्रपटसृष्टीतील एका खास व्यवहाराची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Oct 11, 2026 | 3:47 PM
1 / 5
अगाथियन दिग्दर्शित या चित्रपटात संजय कपूर, प्रिया गिल आणि सुष्मिता सेन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. सलमान खान आणि जॅकी श्रॉफही चित्रपटात दिसले. हा चित्रपट तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक होता.

अगाथियन दिग्दर्शित या चित्रपटात संजय कपूर, प्रिया गिल आणि सुष्मिता सेन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. सलमान खान आणि जॅकी श्रॉफही चित्रपटात दिसले. हा चित्रपट तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक होता.

2 / 5

चित्रपटातील गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. बोनी कपूर यांनी सांगितले की, नदीम-श्रवण यांनी संपूर्ण संगीत एकाच वेळी तयार केले. त्यांनी त्यांना आगाऊ पैसे दिले होते. यामधील 'पहेली पहेली बार मोहोब्बत की है' हे गाणं तयार करताना एक अडचण आली होती.

3 / 5

बोनी कपूर यांनी गाण्यांच्या म्युझिक राइट्ससाठी गुलशन कुमार यांच्याकडे 1 कोटी रुपये मागितले होते. मात्र, गुलशन कुमार यांनी 65 लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली. संजय कपूर आणि प्रिया गिल हे सिनेसृ्ष्टीतील काही सुपरहीट जोडी नाही त्यामुळे इतके पैसे देणं योग्य नाही असंही त्यांना वाटलं.

4 / 5

गाणं हिट झालं तर गुलशन कुमार यांनी बोनी कपूर यांना कार भेट देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्या निधनानंतर भूषण कुमार यांनी ही गोष्ट लक्षात ठेवून बोनी कपूर यांना मर्सिडीज भेट दिली.

5 / 5

‘हम दिल दे चुके सनम’चे संगीतही गाजल्यानंतर भूषण कुमार यांनी संजय लीला भन्साळी आणि झामू सुगंध यांच्यासाठी मित्सुबिशी लॅन्सर खरेदी केल्याचे बोनी कपूर यांनी सांगितले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us